कार्यक्रम » बचतगट नोंदणी कार्यक्रम

बचत गट नोंदणी कार्यक्रम

केवळ बचतगटांची निर्मिती म्हणजे उद्देश्यपुर्ती नव्हे, तर बचतगटांच्या माध्यमातुन स्वयंरोजगार निर्माण करुन बचतगटातील सदस्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे या करीता स्वयंसिध्दा बचतगट फाऊंडेशन झटत आहे. बचतगटांमार्फत स्वयंरोजगारित होण्याकरिता लागते ते कुशल मार्गदर्शन व योग्यते सहकार्य.

तुम्ही तुमचा बचत गट संस्मथेत नोंदवू शकता :
- जर तुम्हाला नवा गट स्थापन करावयाचा असेल
- अस्तित्वात असलेल्या बचतगटास सक्षम करुन स्वयंरोजगार निर्माण करणे

स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई, खालील सदस्यत्व प्रकाराअंतर्गत नोंदविलेल्या गटांना सेवा पुरविते.

सामान्य सदस्यत्व
१) संस्थेचे छत्र उपलब्ध केले जाते
२) फोन द्वारे मार्गदर्शन व पाठपुरावा
३) मासिक / त्रैमासिक न्यूजलेटर द्वारे माहिती पुरविली जाते
४) स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबईद्वारे आयोजित कार्यक्रमात शुल्कात सुट.
५) गटाद्वारे बनविल्या जाणा-या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळविण्यासाठी मदत व मार्गदर्शन
६) सतत प्रेरणा, मार्गदर्शन व प्रशिक्षण पुरविले जाते
७) बचत गटांतील अंतर्गत प्रश्नांवर तोडगा व मार्गदर्शन
८) स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन


आकारले जाणारे शुल्क :
रु 100/- प्रति सदस्य प्रती वर्ष 

नोंदविलेल्या गटास मिळणा-या सुविधा :
१) नोंदणी प्रमाणपत्र
२) नोंदणी क्रमांक 
३) समुपदेशन सुविधा 
४) संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागासाठी  शुल्कात सवलत
५) बचत गट सक्षमीकरण करण्यास मदत व प्रोत्साहन
६) बचत गटा मार्गे व्यवसाय करण्यास मदत व प्रोत्साहन
७) मोफत ई-न्यूजलेटर / मासिक  

स्वयंसिध्दा फाऊंडेशन आपल्या वाटाड्याची भुमिका बजाविते व अपल्या गटासाठी सल्लागाराचे काम करते. संस्था बचतगटांच्या अंतर्गत व्यवहार व आर्थिक उलाढालीत संस्था हस्तक्षेप करत नाही..

आपणही आपला गट  नोंदवू शकता किंवा संस्था कार्यालयास भेट देऊन गट नोंदवू शकता. आपला गट येथे क्लिक करुन नोंदवा

स्वयंसिध्दा फाऊंडेशन
४०१, रेळे स्मृती, 
नदीयादवाला कॉलोनी नंबर १, 
एस.व्ही.रोड, मालाड पश्चिम
मुंबई ४०००६४
फोन : ९९२०९८७५१२
ईमेल : swayamsiddhafoundation@gmail.com