बचत गट कार्यशाळा - डोंबिवली

डोंबिवली येथे बचत गट कार्यशाळा

स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई द्वारा डोंबिवली येथील एस.व्ही. जोशी विद्यालयात, महिला बचत गटांकरिता दिनांक २६.०३.२०१६ रोजी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदरची कार्यशाळा स्थानिक नगरसेविका सौ. खुशबु चौधरी यांच्या प्रयत्नाने आयोजित झाली.


या कार्यशाळेत उपस्थितांना, बचत गट कसा बनवावा, तो कसा चालवावा व त्या मार्गे स्वयंरोजगार कसा करावा आदि विषयांवर माहिती देण्यात आली. संस्थेचे श्री समीर मंचेकर व श्री. विजय जोशी यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.


उपस्थित बचत गट संस्थेच्या 'मदर एनजीओ' या कार्यक्रमा अंतर्गत नोंदणी करणार आहेत.


मागील पान