Parel SHG Workshop

परळ येथे दि.०१ फेब्रुवारी २०१५ रोजी कार्यक्रम

दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१५ रोजी, परळ येथील शिरोडकर विद्यालय येथे नव्या व अस्तित्वात असलेल्या बचत गटांकरीता एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एकूण ६० सदस्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. बचत गट म्हणजे नेमके काय, बचत गट कसा बनवावा, तो कसा वाढवावा, व बचत गटाच्या मार्गाने स्वयंरोजगार कसा करावा इत्यादी विषयांवर माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.  या कार्यशाळेत सहभागी झालेले अनेक बचत गट स्वयंसिध्दा बचत फाऊंडेशन च्या  कार्यक्रमाअंतर्गत आपले गट नोंदवित आहेत.

कार्यशाळेस श्री विजय जोशी, श्री समीर मंचेकर,  विनया सावंत, डॉ. क्षमा तोडणकर, श्री राम गावडे, श्री शैलेश साटम, नम्रता अवेरे, स्वाती सावंत इत्यादी स्वयंसिध्दा बचत गट फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला.