USW Virar

विरार येथे उद्योग साधना वर्कशॉप 

दिनांक २४ जून २०१८ रोजी विरार, जिल्हा पालघर येथे महिलांकरिता उद्योग साधना वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले.  दिवसभर मुसळधार पाऊस पडत असून देखील   एकूण झालेल्या १३० नाव नोंदणी पैकी १२५ महिलांनी आपली उपस्थिती नोंदविली. महिला विरार, वसई, माहीम, पनवेल आदी ठिकाणांवरून आल्या होत्या.

उपस्थितांना उद्योजकता, विविध योजना, मार्केटिंग आदी विषयावर माहिती पुरविली गेली, व कार्यक्रमाच्या दुस-या चरणात पेपर बॅग मेकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या अत्यंत यशस्वी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील संयोजिका व सदस्यांनी केला.


मागील पान